वन नेशन वन इलेक्शन? विरोधकांना टेन्शन ? | #OneNationOneElection

वन नेशन वन इलेक्शन? विरोधकांना टेन्शन ? | #OneNationOneElection

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश, एक निवडणूक तसंच इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय प्रमुखांची बैठक बोलावली. या बैठकीला एनडीएच्या घटकपक्षांनी हजेरी लावली मात्र काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी मोदी सरकारनं चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीचं निमंत्रणही नाकारलं.

काँग्रेस, ममता बॅनर्जींचा तृणमूल, मायावतींचा बसपा, अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षासह चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीकडूनही या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला. दुसरीकडे अनेक विरोधी पक्षांनी या बैठकीला आवर्जून हजेरी लावली.

यात राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल सेक्युलर, जगनमोहन रेड्डींची वायएसआर काँग्रेस, नवीन पटनायकांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल, आम आदमी पक्ष, चंद्रशेखर रावांचा तेलंगणा राष्ट्र समिती या विरोधी पक्षांनीही हजेरी लावली.

यापूर्वीही विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्यासंबंधी मोदी सरकारनं हालचाली सुरु केल्या होत्या. पण त्याला कडवट विरोध झाला होता. आता पुन्हा एकदा एक देश, एक निवडणूक घेण्यासंबंधी मोदी सरकारकडून हालचाली सुरु झाल्यात. आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरुन संसदेचं पावसाळी अधिवेशन गाजणार हे नक्की.

Web Title : marathi news all party meet for one nation one election meeting called by modi sharad pawar was present

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com