काश्मीरमधील दहशतवाद्यांची आता काही खैर नाही.. 

काश्मीरमधील दहशतवाद्यांची आता काही खैर नाही.. 

अतिरेकी कारवायांनी खिळखळं झालेल्या जम्मू काश्मीरमध्ये आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातलंय. दहशतवादी कारवायांना आळा घालतानाच दहशतवाद्यांना फंडींग करणाऱ्यांसाठीही आता सापळा लावला जातोय. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने 'टेरर मॉनिटरींग ग्रुप' हे विशेष दलाची स्थापना केलीय. जम्मू काश्मीर पोलीस दलातील सीआयडी विभागाचे अतिरिक्त पोलीस महानिरिक्षकांच्या या दलाचं नेतृत्व करणार आहेत. तर आयबी, एनआयए,सीबीआय, इन्कम टॅक्स,आणि ईडीच्या अधिकाऱ्यांचा या विशेष दलात समावेश असणार आहे.

काश्मीरमधील दहशतवादाला खतपाणी घालणारा प्रत्येक घटक या दलाच्या निशाण्यावर असणार आहे. त्यासाठी या दलाची आठवड्यातून एक बैठक होईल. या बैठकीत ताज्या घडामोडींवर चर्चा होऊन अॅक्शन प्लॅन ठरवला जाईल. त्याबाबतचा विशेष अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करून तातडीने कारवाई केली जाईल. याशिवाय दहशतवाद्यांची नांगी ठेचण्यासाठी मदत करणाऱ्या साक्षिदारांच्या संरक्षणालाही प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी या साक्षिदारांना चार्ली, अल्फा, रोमियो, हॅरी पॉटर यासारखे कोडवर्ड देण्याची योजना तयार करण्यात आलीय.  

सध्या सक्रिय असलेले अतिरेकी गट नेस्तनाबूत करतानाच भविष्यातील कारवायांना चाप बसावा म्हणून 'टेरर फंडिंग' करणाऱ्यांवर नजर ठेवणं हा सुद्धा या दलाचा उद्देश असणार आहे. त्यासाठी जम्मू काश्मीरमधील बँकांमधल्या संशयास्पद व्यवहारांचा माग काढला जाणार आहे. आजवर काश्मीरमधील दहशतवाद रोखण्यासाठी अनेक उपाय केले. मात्र इथला दहशतवाद आजही कायम आहे. त्यामुळे शहांचा हा प्लान कितपत यशस्वी होणार हे येणारा काळच ठरवेल. 

WebTitle : marathi news amit shah forms terror monitoring group to take serious action against terrorist in pakistan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com