पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराबाबात प्रथमच अमित शहांनी केले महत्वाचे वक्तव्य
''पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत आहे. इंधनाच्या दरवाढीवरून जनतेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इंधनाच्या या दरवाढीवर केंद्राकडून लवकरच 'अॅक्शन प्लॅन' आखण्यात येणार आहे'', असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता अमित शहा यांनी हैदराबाद येथील पत्रकार परिषदेत यावर वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ''आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. हे दर कमी करण्यासाठी केंद्राकडून लवकरच 'अॅक्शन प्लॅन' आखण्यात येणार आहे.
तसेच आम्हाला माहिती आहे, की जनता या दरवाढीविरोधात आंदोलने करत आहेत. भाजपही या दरवाढीवर चिंतेत आहे''.
दरम्यान, 1 ऑगस्टपासून पेट्रोलच्या दरात सुमारे 6 टक्के तर डिझेलच्या दरात 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 89.01 रुपये प्रतिलिटर तर राजधानी दिल्लीमध्ये 81.63 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे.