शुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर : अमृता फडणवीस

शुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर : अमृता फडणवीस

मुंबई : लक्झरी क्रुझच्या उद्घाटनावेळी क्रुझच्या काठावर जाऊन सेल्फी काढल्याने ट्रोल झालेल्या अमृता फडणवीस यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. शुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे, की जवळपास दहा मिनिटे मी तेथे बसले होते. ज्याठिकाणी बसले होते तेथे खाली आणखी जागा होती. चुकीचे वाटत असेल तर माफी मागते. जीव धोक्यात घालून सेल्फी काढू नका. मी जिथे बसले तेथे काहीच धोकादायक नव्हते. मी त्याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी नव्हे तर शुद्ध हवा घेण्यासाठी बसले होते. 

मुंबई-गोवा या देशातील पहिल्या लक्‍झरी क्रूझ सेवेचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, यावेळी अमृता फडणवीस यांनी जहाजाच्या काठावर उभे राहून काढलेला सेल्फी चर्चेचा विषय ठरला.

Web Title : marathi news amruta fadanvis on the deck of mumbai goa cruise clarification of mrs fadanvis 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com