चंद्राबाबू नायडूंचा ८ कोटींचा बंगला उधवस्त

चंद्राबाबू नायडूंचा ८ कोटींचा बंगला उधवस्त

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अमरावती येथील निवासस्थानानजीक असलेली प्रजा वेदिके ही इमारत मंगळवारी रात्री पाडण्यात आली. ही इमारत पाडण्याचे आदेश राज्याचे नूतन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिले होते.

ही इमारत बेकायदा असून अशाप्रकारच्या सर्व इमारती पाडण्यासाठी सुरु केलेल्या अभियानाअंतर्गत सर्वांत प्रथम ही इमारत पाडण्यात येणार असल्याचे जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले होते. ही इमारत नायडू सरकारच्या कार्यकाळादरम्यान सुमारे ८ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आली होती. नायडू यांच्या बंगल्यानजीक या कॉन्फरन्स हॉलमध्ये अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली जात असत. या ठिकाणीच नायडू हे नागरिकांना भेटत असत. हा हॉल खूप मोठा आणि सर्वसुविधांनी युक्त होता. अमरावती येथील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर नायडू यांचा बंगला आणि इमारतीचा दरवाजाही एकच होता.

ही इमारत बेकायदा असल्याचा दावा जगनमोहन यांनी केला होता. या इमारतीच्या उभारणीसाठी परवानगी घेतली नव्हती. सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने इमारतीसाठी परवानगी घेतली नव्हती. त्याचबरोबर पर्यावरणाशी निगडीत नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. प्रारंभी ही इमारत ५ कोटीत होणार होती. परंतु इमारत पूर्ण होईपर्यंत यासाठी ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. 

दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी इतकी चांगली इमारत पाडणे हा मुर्खपणा असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षाचे नेते म्हणून आम्ही या इमारतीचा वापर करु अशी विनंती आम्ही सरकारकडे केली होती. जर त्यांना ही इमारत आम्हाला द्यायची नव्हती. तर त्याचा त्यानी स्वतः वापर करायला हवा होता, असेही ते म्हणाले.

Web Title:  Andhra Pradesh Praja Vedike building is Demolish the building was constructed by the N Chandrababu Naidu

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com