लोक मागत आहेत चारा छावण्या, हे देत आहेत डान्सबार, लावण्या - अशोक चव्हाण

लोक मागत आहेत चारा छावण्या, हे देत आहेत डान्सबार, लावण्या - अशोक चव्हाण

कणकवली - देशातले मोदी सरकार गेल्या साडेचार वर्षात आपली आश्वासने पूर्ण करू शकलेले नाही आणि राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारने सुद्धा लोकांच्या तोंडाला पाने पुसली. लोक मागत आहेत चारा छावण्या हे देत आहेत डान्सबार लावण्या, अशी कोपरखळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मारली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज कणकवलीत दाखल झाली. यावेळी शहरात रॅली काढून येथील भगवती मंगल कार्यालयात आयोजित काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते

अबकी बार बस कर यार, असे जनता म्हणत आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी सेना - भाजपच्या घोषणांच्या महापुरात जनतेने वाहून जाऊ नये. सत्तेतून खाली खेचण्याची ताकद सामान्य नागरिकांमध्ये आहे. त्यांनी ती करून दाखवावी, - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष

यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आमदार नसीम खान काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत भाई जगताप हुसेन दलवाई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विकास सावंत माजी आमदार विजय सावंत आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, काँग्रेसला कोकणात मानणारा मोठा घटक आहे काँग्रेसच्या झेंड्याखाली अनेकांनी या देशाची सेवा केली आहे अशा पक्षातून मोठ्या झालेल्या लोकांनी पक्षासाठी योगदान द्यावे. काँग्रेसला ताकद दिली, तर तुमच्या मनातले नेतृत्व उभे राहिल. लोकांचे अनेक प्रश्न आहेत. देशाची परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे काँग्रेसकडे लोक सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत

भाजप गुंडांचा पक्ष आहे त्यांची भाषा पाहिल्यानंतर हे लक्षात येते. आता त्यांनी ही भाषा कणकवलीतुन शिकली की अन्यकडून ते मला माहित नाही

- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष

श्री. चव्हाण म्हणाले,  राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी लागली मात्र ती अजूनही कागदावर आहे मराठ्यांच्या आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले आणि आम्ही विधानसभेत अधिवेशन बंद पडले म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळाले मात्र सरकारने हे आरक्षण फसव्या पद्धतीने दिलेले आहे या कोकणी जनतेने सेना-भाजप युतीला मागच्या वेळेला मदत केली होती त्या सरकारने इथले कारखाने बंद पडले. एमआयडीसीतील 90 टक्के उद्योग बंद आहेत. कोकणी जनतेच्या माथ्यावर नाणार सारखे प्रकल्प लादले जात आहेत. 

यावेळी नसीम खान, विजय सावंत, काका कुडाळकर, विकास सावंत यांनी मार्गदर्शन केले. 

एम एच  09 मधून शेकडो कार्यकर्ते कणकवलीत

कणकवली हा नारायण राणे यांचा बाले बालेकिल्ला आहे. या तालुक्यात किंबहुना या मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते फारशे पक्षात सक्रिय नाहीत, त्यामुळे आजच्या काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला राधानगरीच्या के पी पाटील यांनी एम एच  09 मधून शेकडो कार्यकर्ते कणकवलीत आणले. किंबहुना भगवती मंगल कार्यालयातील बहुतांशी खुर्च्या आणि त्यातील बसलेले कार्यकर्ते त्यांच्या डोक्यावर पांढऱ्या टोप्या या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

Web Title: Ashok Chavan comment

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com