केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलं रिट पिटीशन; राम मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारनं कसली कंबर

केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलं रिट पिटीशन; राम मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारनं कसली कंबर

आगामी निवडणुका लक्षात घेता राम मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारनं कंबर कसली आहे. अयोध्येतील राम मंदिराबाबतची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येतेय. हिंदू पक्षकारांची जमीन राम जन्मभूमी न्यासला देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने द्यावेत अशी विनंती सरकारनं केली आहे. केंद्र सरकारनं याबाबत रिट पिटीशन दाखल केलंय. 

सुप्रीम कोर्टात हे रिट प्रिटीशन दाखल कऱण्यात आलंय. अयोध्येतील वादग्रस्त जमीन वगळता, उर्वरीत जमीन हिंदू पक्षकारांकडे हस्तांतरीत केली जावी, अशी मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर निर्माणाप्रकरणी घडामोडींना वेग आलाय. शिवसेनेकडूनही मित्रपक्ष भाजपवर राम मंदिरासाठी सातत्यानं दबाव घातला जातोय. यावरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यानाथ यांनीही मोठ विधान केलं होतं. जर सुप्रीम कोर्ट या वादावर लवकरात लवकर निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर कोर्टाने हे प्रकरण आमच्याकडे सोपवावे, आम्ही २४ तासांत हा प्रश्न सोडवू, असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.
 
दरम्यान आता याप्रकरणी सुप्रीम कोर्ट काय सुनावणी करतं, हे पाहणं ही महत्त्वाचंय. 

WebTitle : marathi news ayodhya ram mandir centre files writ petition to supreme court 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com