#BharatBand -'बाहुबली आणि कटप्पा' उतरले रस्त्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह वेगवेगळे पक्ष, संघटना रस्त्यावर उतरले आहेत. पण लातूरमध्ये चक्क बाहुबली आणि कटप्पा हेच रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.

इंधन दरवाढ मागे घ्या, अन्यथा सरकार पाडु, असे सांगत बाहुबलीने ‘मेरा वचनही, मेरा शासन है’ अशी घोषणा दिली.

सरकारच्या धोरणाविरोधात देशभर बंद पुकारण्यात आला आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनेही केली जात आहेत. लातूरात तर चक्क बाहुबलीच पाठीवर सिलेंडर घेऊन महागाईकडे लक्ष वेधून घेत आहे. सरकारने बाहुबलीचेही नाही ऐकले तर शेवटी मी आहेच, असे कटप्पा आंदोलनात सांगत होता.

रत्नदीप आजनीकर यांनी बाहुबलीचा तर अभिजित ओहाळ यांनी कटप्पाचा वेश परिधान केला होता. राजु गवळी यांनी वासुदेवाचा तर प्रविण कांबळे यांनी पोतदाराच्या वेशात इंधन दरवाढीविरोधात आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live