दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर महिनाभरात बंदी

दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर महिनाभरात बंदी

प्लास्टिक बंदीनंतर आता दुधाच्या प्लास्टिक पिशव्याही लवकरच  हद्दपार होणार आहेत. येत्या महिनाभरात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ही माहिती दिलीय. 

दुधाच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार असला तरी सध्या ग्राहकाला दुधाची पिशवी घेताना 50 पैसे डिपॉझिट द्यावे लागणार आहे. पिशवी परत केल्यानंतर दुकानदार 50 पैसे परत करेल राज्यात दररोज १ कोटी दुधाच्या पिशव्यांचा वापर  होतो. त्यातून  31 टन कचरा निर्माण होतो. दरम्यान प्लास्टिक बंदीपूर्वी राज्यात 1 हजार 200 टन कचरा निर्माण होत होता. मात्र बंदीनंतर त्यात घट होऊन तो 600 टन झालाय.

राज्यात 23 जूनपासून सरसकट प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली होती. त्यातून दुधाच्या पिशव्यांना सूट देण्यात आली होती. मात्र, आता दुध पिशव्यांवरही बंदी घालण्यात आलीय. या बंदीनंतर थोडीशी गैरसोय होईल मात्र चांगल्या भविष्यासाठी ह्याला सगळ्यांनीच पाठिंबा देण्याची गरज व्यक्त केली जातंय.

WebTitle : marathi news ban on plastic bags soon to impose in maharashtra says environment minister ramdas kadam 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com