ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड काळाच्या पडद्याआड

बंगळूर : ज्येष्ठ अभिनेते व प्रसिद्ध लेखक गिरीश कार्नाड (वय 81) यांचे आज (सोमवार) प्रदीर्घ आजारपणाने निधन झाले.

गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर बंगळूरमध्ये उपचार सुरु होते. अखेर आज त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे. साहित्य विश्वातही त्यांचा मोलाचा वाटा होता. नाटककार म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. सरकारच्या काही निर्णयांविरोधात त्यांनी रोखठोक भूमिका घेतल्या होत्या.

कार्नाडांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर या नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कार्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशांत बरेच नाव कमावले.

गिरीश कार्नाड यांचे चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले. हा चित्रपट एस्‌. एल्‌. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कार्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते. नंतर कार्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे तब्बलियू नीनादे मगने व ओंदनोंदू कालादल्ली हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट, आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत. गिरीश कार्नाड यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही खूप गाजला होता.

गिरीश कार्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.

Web Title: Veteran playwright and actor Girish Karnad passes away at the age of 81 after a prolonged illness in Bengaluru

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com