जिल्हा मध्यवर्ती बँकेने 6 लाखांची नाणी देऊन केली शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा
पीक विम्याच्या रककेमेसाठी महिना - महिना चकरा मारणाऱ्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा झाल्याचं समोर आलंय.
एरव्ही 10 रुपयांची नाणी नाकारणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 6 लाखाची नाण्यांचं वाटप करण्यात आलंय.
कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या पीक विम्याची रक्कम वाटप करण्यास, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडुन नेहमीच चालढकल होते. अशात पीक विम्याची रक्कम खात्यावर जमा होवून दोन महिने झाले तरी प्रत्यक्षात पैसे देण्यास बँकेकडून टाळाटाळ केली जाते.

शेतकरी बँकेकडे महिना महिना हेलपाटे मारून बेजार होत असताना चक्क दहा रुपयांची नाण्यांच्या रुपात पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिल्याचं उघडकीस आलंय.