बीडमध्ये ईव्हीएम हॅकिंगचा प्रकार?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 मे 2019

बीड : दोन दिवसांत निवडणुकींचा निकाल जाहीर होणार असताना बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी कशाला हवी आहे? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तर, प्रश्न उपस्थित करताना हा ईव्हीएम हॅकींगचा प्रकार तर सुरू नाही ना? असा सवालही त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या या प्रश्नामुळे बीड जिल्ह्यात खरंच ईव्हीएम हॅकिंगचा प्रकार तर चालू नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात चर्चेची आणि भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या झाली होती. निवडणुकीच्या निकालाबाबत आजही दोन्ही पक्ष तेवढेच कॉन्फीडन्ट आहेत. त्यामुळे २३ तारखेला लागलेला निकाल काही वेळ तर खरा वाटणारा नसेल आणि अगदीच धक्कादायकच असेल असे मानले जात आहे. विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांना पुन्हा उमेदवारी दिलेल्या भाजपकडून सुरुवातीला बळीचा बकरा कोण, असे टोमणे राष्ट्रवादीला मारले गेले. पण, राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना रिंगणात उतरविले आणि निवडणुकीचा नुर पालटला. शेतकरी पुत्र ही टॅगलाईन सोनवणेंसाठी फायद्याची ठरली आणि त्यांना मतदारांत मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपच्या नाकी नऊ आले होते.

Web Title: Dhananjay Munde accused Pankaja munde Over EVM Hacking

संबंधित बातम्या

Saam TV Live