जयदत्त क्षीरसागर यांना शिसेनेकडून मंत्रीपद मिळणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 मे 2019

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणारे आमदार जयदत्त क्षीरसागर हे बुधवारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी रात्रीच मुंबईकडे कुच केले आहे. त्यांना आरोग्यमंत्रीपदही भेटणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या समवेत त्यांचे धाकटे बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागरही प्रवेश करतील.

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणारे आमदार जयदत्त क्षीरसागर हे बुधवारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी रात्रीच मुंबईकडे कुच केले आहे. त्यांना आरोग्यमंत्रीपदही भेटणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या समवेत त्यांचे धाकटे बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागरही प्रवेश करतील.

जिल्ह्याच्या राजकारणातील बडी आसामी अशी जयदत्त क्षीरसागर यांची ओळख आहे. मात्र, मागच्या ५० वर्षांच्या राजकारणात दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांच्यापासून हे घराणे कायम काँग्रेसी विचाराचे राहीले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर क्षीरसागर राष्ट्रवादीत आले. काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीत जयदत्त क्षीरसागर यांनी उपमंत्री, राज्यमंत्री आणि महत्वाच्या खात्यांचे कॅबीनेट मंत्री म्हणून काम केले. २०१४ मध्ये मोदी लाट आणि दिवंगत मुंडेंची सहानुभूती या कारणाने जिल्ह्यात राष्ट्रवादीची पुरती पिछेहाट झाली. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झालेल्या बीडमधून एकटे जयदत्त क्षीरसागरच राष्ट्रवादीकडून विजयी झाले. नंतर मात्र त्यांच्या विरोधात बंड करणाऱ्या पुतण्याला पक्षातील नेत्यांकडून ताकद दिली जाऊ लागली. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर नाराज होते.

मागच्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील अशा अटकळी बांधल्या जात होत्या. त्यातच त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात समर्थकांचा मेळावा घेतला आणि भाजपच्या डॉ. प्रितम मुंडे यांना विजयाचे आवाहन केले. त्यामुळे ते भाजपमध्येच जातील अशी दाट शक्यता वाटत असतानाच त्यांनी दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हापासून ते शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. आता त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त पक्का झाला असून ते बुधवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेणार आहेत. जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रवेशासाठी त्यांचे शिलेदार तर मुंबईकडे रवाना झालेच आहेत. शिवाय त्यांच्या प्रवेशासाठी शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनाही मातोश्रीचे बोलावणे आल्याने तेही रवाना झाले आहेत. बुधवारी दुपारी एक वाजता हा प्रवेश सोहळा होईल. जयदत्त क्षीरसागर यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेले त्यांचे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे देखील प्रवेश करतील. 

लवकरच मंत्रीपदाचीही शक्यता
दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेच्या कोट्यातून लवकरच मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना आरोग्यमंत्रीपद भेटणार असल्याचे सांगीतले जाते.

Web Title: NCP MLA Jayadatta kshirsagar joins Shivsena


संबंधित बातम्या

Saam TV Live