कलबुर्गी हत्याप्रकरणी एसआयटीकडून एकाला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 जून 2019

बेळगाव : प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी कर्नाटक एटीएसने एका तरुणाला बेळगांवमधून अटक केली असून धारवाड न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दाभोलकर-पानसरे व कलबुर्गी खूनप्रकरणात एकाच विचारांच्या शक्तींचा सहभाग असल्याचा संशय वारंवार व्यक्त करण्यात आला आहे; किंबहुना हे तिनही खून एकाच बंदुकीतून झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे; परंतु या तिन्ही खुनांचा सध्या तपास करणाऱ्या सीबीआय, एनआयए या तपास यंत्रणा व महाराष्ट्र शासन, कर्नाटक व गोवा शासन यांच्यामध्ये समन्वय नाही.

गेल्या काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंतांची हत्या करण्यात आली होती. कलबुर्गी यांचा खून 30 ऑगस्ट 2015ला झाला. त्याला आता दोन वर्षे होऊन गेली तरी तपास ठप्प आहे. लंकेश, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागल्यास त्यातून पानसरे यांच्या खुनाचीही उकल होईल, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हुबळीचा गणेश मिस्कीन (वय 27) हा लंकेश यांच्या खुनावेळी मोटारसायकल चालवत असल्याचे स्पष्ट झाले असून तो एसआयटीच्या अटकेत आहे. ज्या चौघांचा खुनातील सहभाग स्पष्ट होत आहे, त्यातील एक महाराष्ट्रातील असल्याचे समजते. कर्नाटक एटीएसने प्रवीण चतूर या तरुणाला सहा महिन्यांपूर्वीच ताब्यात घेतले होते. मात्र, त्याची चौकशी करून सोडून देण्यात आले होते. आज एटीएसने चतूरला पुन्हा अटक केली असून त्याला धारवाड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Belagavi resident arrested in Kalburgi murder case

संबंधित बातम्या

Saam TV Live