"भीम अॅप'द्वारे ट्रान्स्फर केलेले पैसे गायब..

"भीम अॅप'द्वारे ट्रान्स्फर केलेले पैसे गायब..

सावंतवाडी - केंद्र शासनाकडून नियमित आर्थिक व्यवहारासाठी काढण्यात आलेला "भीम अॅप' ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या अॅपच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात येणारी रक्कम अचानक गायब होण्याचा प्रकार सुरू आहेत. शहरातील दोघा ग्राहकांना हा अनुभव आला. याचे नियंत्रण आमच्याकडे नाही, असे सांगून खाते असलेल्या बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी हातवर केले आहेत.

तब्बल महिना उलटला तरी कट झालेले पैसे पुन्हा जमा न झाल्याने आता काय करावे हा प्रश्‍न त्या ग्राहकांसमोर आहे. केंद्र शासन आणि पंतप्रधान मोदी यांच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेतून "भीम अॅप' लॉंच करण्यात आला होता. या माध्यमातून करण्यात येणारे आर्थिक व्यवहार पारदर्शक असतील, असा दावा करण्यात आला होता; परंतु गेले काही दिवस या अॅपच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार अडचणीत सापडले आहेत.

बॅंकेतून पैसे कट झाल्यानंतर सुद्धा ते तात्काळ पुन्हा जमा न होण्याचे प्रकार घडत आहेत. शहरातील दोघा ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसला. येथील महाराष्ट्र बॅंकेत एका ग्राहकाने आपले आर्थिक व्यवहार केले होते. भीम अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करताना ते संबंधित व्यक्तीला पोहोचलेच नाहीत. दुसरीकडे पैसे कट झाले ते पुन्हा जमा झाले नाही, असा प्रकार घडला. बॅंकेच्या प्रशासनास संपर्क साधला असता याचे नियंत्रण आमच्याकडे नाही, तुम्ही तुमचा लेखी अर्ज द्या, असे सांगून त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

दुसरा प्रकार बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत घडला आहे. दोन्ही आर्थिक व्यवहार होताना प्रथम पेंडिंग असा मेसेज आला आणि त्यानंतर पैसे कट झाले, असा मेसेज आला; परंतु प्रत्यक्षात संबंधित पाठवणाऱ्या व्यक्तीला पैसेच पोहोचले नाहीत. त्यामुळे दोघांनीही बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता पैसे तुमचे जमा होतील, आमच्याकडे याचे नियंत्रण नाही, असे सांगून त्यांनी हात वर केले आहेत. त्यातील एका ग्राहकाचे महिनाभरापूर्वी पैसे कट झाल्याचा प्रकार घडला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com