सोशल मीडियावर हिंदू देव-देवतेबद्दल अपमानकारक पोस्ट केल्याने बीडमध्ये दुकान पेटवले

सोशल मीडियावर हिंदू देव-देवतेबद्दल अपमानकारक पोस्ट केल्याने बीडमध्ये दुकान पेटवले

आष्टी (जि. बीड) :  हिंदू देव-देवतांबद्दल सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट प्रसिद्ध केल्याने कडा शहरातील एका चायनिज सेंटर चालकाच्या दुकानाची शुक्रवारी (ता. 22) रात्री उशिरा अज्ञात इसमांनी मोडतोड केली. यानंतर आज (ता. 23) सकाळी याची माहिती झाल्यानंतर संतप्त जमावाने त्याचे दुकान आग लावून पेटवून दिले. यामुळे कडा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील कडा येथील जुन्या बसस्थानकाजवळ मजहर अकबर शेख याचे चायनिज सेंटरचे दुकान आहे. शुक्रवारी त्याने आपल्या व्हॅटस्अप स्टेटसला हिंदू देव-देवतांबद्दल अश्लील व विडंबनात्मक छायाचित्र असलेला मजकूर प्रसिद्ध केला होता. याची माहिती तरुणांना झाल्यानंतर कडा शहरात संतापाची तीव्र लाट उसळली. तरुणांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर मजहर शेख यास पोलिसांनी शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. रात्री उशिरा अज्ञात इसमांना त्याच्या चायनिज सेंटर दुकानाची मोडतोड करून नुकसान केले. आज (ता. 23) सकाळी घटनेची कडा शहरात सर्वत्र चर्चा झाल्यानंतर संतप्त जमावाने मजहर शेखच्या मालकीचे चायनीज सेंटरचे टपरीवजा दुकान पेटवून दिले.

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी कडा येथे घटनास्थळी भेट देवून पोलिसांना सूचना केल्या. यानंतर ग्रामपंचायतमध्ये दोन्ही समाजबांधवांची बैठक घेऊन शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले. घटनेमुळे कड्यात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून, या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर सायबर अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Offensive post about Hindu Gods and Goddesses on social media

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com