निवडणूक झाली;'चौकीदार'ही गेला

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये भाजपला विजय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व पुढे येत असताना भाजपच्या नेतेमंडळींनी आपल्या नावापूर्वी असलेला 'चौकीदार' हा शब्द आता काढून टाकला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावापूर्वी 'चौकीदार' हा शब्द लिहिला होता. या सर्व नेतेमंडळींच्या नावांपूर्वी फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावर 'चौकीदार' असे होते. मात्र, आता हा शब्दच निवडणुकीच्या निकालाच्या काही मिनिटांतच काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत. 

Web Title: BJP Leaders Remove Chowkidar Word From Their Social Media Account

संबंधित बातम्या

Saam TV Live