भाजप आमदाराला फेसबुकद्वारे जीवे मारण्याची धमकी 

भाजप आमदाराला फेसबुकद्वारे जीवे मारण्याची धमकी 

भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांना काल एक तरुणानं सोशल मिडियावरून जीवे मारण्याची धमकी दिलीय. संभाजीराजे भोसले असं या तरुणाचं नाव असून मी एका बीजेपी आमदाराचा खून करणार आहे. फडणवीस सरकारला माझं ओपन चॅलेंज आहे.

थांबवू शकत असाल तर मला थांबवा अशी धमकीवजा पोस्ट त्यानं फेसबुकवर टाकलीय. आपल्या प्रतिक्रीयेत त्यानं आमदार अतुल सावे यांचं नाव घेतल्यानं मोठी खळबळ उडालीय. या पोस्टच्या विरोधात आज भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्तांची भेट घेत धमकी देणाऱ्यास अटक करण्याची मागणी केली.

शहरातील युवराज छत्रपती संभाजीराजे इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक म्हणून काम करणाऱ्या संभाजीराजे भोसले यांच्या फेसबुक अकाऊंटवर रात्री उशीरा ही पोस्ट करून भाजप आमदाराचा खून करणार असल्याचं लिहलंय.. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com