जल्लोष म्हणून भाजपने जेसीबीतून उधळलेल्या 50-60 पोतं भंडाऱ्याचा त्रास नागरिकांना
पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीतला भाजपचा जल्लोष, नागरिकांना चांगलाच महागात पडला आहे. जेसीबीमधून उधळलेला 50-60 पोतं भंडारा आणि त्यात भर म्हणून पावसाची हजेरी.. यामुळे रस्त्यावर भंडाऱ्याचा चिखल झाला होता.
ज्यामुळे अनेक बाईकस्वारांचा तोल जाऊन ते पडले. तर पादचाऱीही पडल्याच्या घटना घडल्या.. अखेरीस या भंडाऱ्याच्या संकटातून सोडवण्याकरता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.
अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या सहाय्याने भंडाऱ्याचा थर हटवला. मात्र भाजपच्या या सेलब्रेशनमुळे घडलेले अपघात सीसीटीव्हीत कैद झाले आहेत..