भारतीयांचा 34 लाख कोटी काळा पैसा हा देशाबाहेर

भारतीयांचा 34 लाख कोटी काळा पैसा हा देशाबाहेर

1980 ते 2010 दरम्यान भारतीयांनी 34 लाख कोटी परदेशात पाठवल्याची धक्कादायक माहिती.3 बड्या संस्थानचा अहवाल.

काळ्या पैशावरील राजकीय वादादरम्यान मार्च २०११ मध्ये तत्कालीन सरकारने तीन संस्थांना देश आणि देशाबाहेरील भारतीयांच्या काळ्या पैशाचा अभ्यास करण्याचा जबाबदारी दिली होती. 

या तीन संस्थांमध्ये राष्ट्रीय लोक वित्त आणि निती संस्था (एनआयपीएफपी), राष्ट्रीय व्यावहारिक आर्थिक शोध परिषद (एनसीएईआर) आणि राष्ट्रीय वित्तीय प्रबंध संस्था (एनआयएफएम) यांचा समावेश आहे. 

काँग्रेसचे वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १६ वी लोकसभा भंग होण्यापूर्वी २८ मार्च रोजी लोकसभा अध्यक्षांना आपला अहवाल सोपवला होता.

समितीने म्हटले आहे की, या विषयाशी संबंधित सर्व पक्षांमधील काहींशी चर्चा करण्यात आली. कारण आमच्याकडे वेळेचा अभाव होता. त्यामुळे या संदर्भात बिगर सरकारी साक्षीदार आणि तज्ज्ञांशी चर्चा करण्याची कसरत पूर्ण करण्यापर्यंत या समितीचा अहवाल प्राथमिक स्वरुपात घेता येऊ शकतो.

Web Title: Black Money Report Indians unaccounted wealth abroad 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com