धोकादायक झाडांसदर्भात BMC ची पोस्टरबाजी

धोकादायक झाडांसदर्भात BMC ची पोस्टरबाजी

पावसाळ्यात झाडं पडून दुर्दैवी घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं पोस्टरबाजीची शक्कल लढवलीय. महापालिकेनं धोकादायक झाडांवर हे पोस्टर लावलेत. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यात हे झाड पडू शकतं. सतर्क राहा असा मजकूर या पोस्टर्सवर आहे. महापालिकेनं जवळपास 10 हजार धोकादायक झाडांवर पोस्टर लावलेत. यापैकी निम्मे इंग्रजीतून तर निम्मे मराठीतून आहेत. विशेष म्हणजे पावासाळा सुरु होण्याआधीच झाडं पडल्याच्या घटना घडल्यामुळेच सुरक्षेसाठी पालिकेनं हे पाऊल उचललं 

धोकादायक झाडांवर पोस्टर्स लावून काहीही साध्य होणार नाही असं मुंबईकरांचं म्हणणं आहे.  गेल्या काही वर्षात मुंबईत धोकादायक झाडं जीवघेणी ठरतायेत 

  • 2015 मध्ये - 9
  • 2016 मध्ये - 3
  • 2017 मध्ये - 4  
  • 2018 मध्ये - 7 

मुंबईकरांनी झाड किंवा झाडाची फांदी अंगावर पडून आपला जीव गमावलाय.. 

विशेष म्हणजे महापालिकेच्या पॉलिसीनुसार झाड अंगावर पडून जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी 50 हजार रुपये दिले जातात तर मृत्युखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. एकीकडे तुटपुंजी मदत दुसरीकडे धोकादायक झाडं असल्याची पोस्टर्सबाजी. यातून महापालिका आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप केला जातोय.

WebTitle : marathi news BMC puts warning boards on dangerous trees 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com