(VIDEO) 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी'चा टीझर प्रदर्शित

(VIDEO) 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी'चा टीझर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना राणावत हिचा बहुचर्चित सिनेमा 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी'चा टीझरचा नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्याच्या तीन तासातच 2 लाखाच्यावर टीझरला व्ह्युज् मिळाले आहे. 'मणिकर्णिका' हा सिनेमा 19 व्या शतकातील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीशी लढून आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या झाशीच्या राणीने इतिहास घडविला. 'मै मेरी झाँसी नही दूंगी' असे म्हणत त्या हिरकणाचा इतिहास आणि त्याग या सिनेमातून मांडला आहे. 

'खूब लडी मर्दानी थी वो झाँसी वाली रानी थी वो' 'हर हर महादेव' असे टीजरमधील डायलॉग अंगावर शहारे आणणारे आहेत. तसेच युध्द भूमी आणि मणिकर्णिकाने ब्रिटीशांविरोधात उभी केलेली फौज यांचा लढा दाखवला आहे. 'मणिकर्णिका'चे दिग्दर्शन क्रिश जगरलामुडी यांनी तर निर्मिती कमल जैन आणि झी स्टुडिओने केली आहे. सिनेमाची कथा के. व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी लिहीली आहे. प्रसाद यांनीच 'बाहुबली'ची पटकथा लिहीली होती. कंगनासोबत सिनेमात निहार पांड्या, सोनू सूद, अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी हे कलाकारही झळकणार आहे. निहार हा दुसऱ्या बाजीरावच्या भूमिकेत आहे. 

'मणिकर्णिका'तील कंगणाच्या वेशभूषेचीही खूप चर्चा आहे. सिनेमातील शूटींगवेळी तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. कंगणानेही 'मणिकर्णिका' च्या भूमिकेतील तिचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. 

WebTitle : marathi news Bollywood hindi film film teaser of Manikarnika released 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com