एखाद्या ब्रिटीशरला भेळ विकताना तुम्ही पाहिलंय का ? हा व्हिडीओ पाहाच 

एखाद्या ब्रिटीशरला भेळ विकताना तुम्ही पाहिलंय का ? हा व्हिडीओ पाहाच 

आपल्याकडे कुठेही जा.. पेटपुजा करण्यासाठी कुठेतरी वडापावची गाडी तरी असते नाही तर समोसा तरी खायला मिळतो. शेवपुरी, पाणीपुरी, चायनीजचे स्टॉल्स तर चौका चौकात पाहायला मिळतात. यातलं काहीच नसेल तर भेळवाला हमखास असतोच असतो. परदेशातलं म्हणाल तर तिथले पिझ्झा, बर्गर या पदार्थांइतकेच प्रसिद्ध आहेत. पण लंडनमध्ये चक्क भेळवाला पाहायला मिळाला. 

हा भेळवाला भारतीय नाही बरं का. फॉरेनर लोकच भेळ विकताना दिसतायेत. हे चित्र आहे लंडनमधल्या ओव्हल मैदानाबाहेरचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातल्या वर्ल्डकप सामन्यावेळी मैदानाबाहेर एका बिट्रीश आजोबांनी भेळीचा स्टॉल लावला होता. एखाद्या भारतीय भेळवाल्या इतक्याच सफाईदारपणे खवय्यांना ते भेळ बनवून देत होते. 

सध्या या भेळवाल्या आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय.  अमिताभ यांनीही हा व्हिडीओ रिट्विट केलाय. व्हेरी वेल डन च्या चालीवर त्यांनी व्हेरी भेल डन ! असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ रिट्विट केलाय. ब्रिटीश आजोबांनी भारतीयांची ही खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार रुजवल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावर होतोय. 

WebTitle : marathi news british citizen selling bhel around oval stadium in england 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com