कसा झाला कोल्हापूरचा मिनी बस अपघात? (CCTV Video)

कसा झाला कोल्हापूरचा मिनी बस अपघात? (CCTV Video)

कोल्हापूर : येथील शिवाजी पुलाचा कठडा तोडून पंचगंगा नदीत मिनी बस कोसळून 13 जण जागीच ठार झाल्याच्या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज हाती आले आहे. चालकाने अचानक वाहनाची दिशा बदलल्याचे आणि गाडीने अक्षरशः नदीत झेप घेतल्याचे सीसीटीव्ह फुजेटवरून दिसते आहे.  चालकाने वाहनाची दिशा अचानक का बदलली; रस्त्यावर फारशी वर्दळ नसताना हा अपघात कसा घडला, हे प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. 

<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FSakalNews%2Fvideos%2F10155522609461973%2F&show_text=0&width=560" width="560" height="315" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>


मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिणी आणि नऊ महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. हे सर्वजण पुण्यातील आहेत. 26 जानेवारीला रात्री 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. गणपतीपुळे येथे मुलासाठी बोललेला नवस फेडून हे सर्वजण परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. ज्या मुलासाठी नवस बोलला तो मुलगा, त्याचे आई-वडील व बहीण असे सर्वच या अपघातात ठार झाले. बस अत्यंत वेगाने होती. 100 फूट खोल बस पडल्याने बसचाही चक्काचूर झाला. 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com