काँग्रेसने मला माझी जागा दाखविली : Navjyotsingh Siddhu

काँग्रेसने मला माझी जागा दाखविली : Navjyotsingh Siddhu

चंदीगढ (पंजाब): काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मोगा येथील रॅलीमध्ये पक्षाचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना बोलवण्यात न आल्याने ते नाराज झाले असून, काँग्रेसने मला माझी जागा दाखविली आहे, असे सिद्धू यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांची कर्जमाफीच्या योजनेसाठी मोगा येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे आयोजन मंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी केले होते. यावेळी सिद्धू यांना भाषण देण्यास मनाई करण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या सिद्धू यांनी, 'जर मी राहुल गांधी यांच्या सभेमध्ये बोलण्यासाठी योग्य नसेन, तर एक प्रवक्ता किंवा प्रचारक म्हणूनही अयोग्य आहे. पुढील काळात मला बोलण्यासाठी बोलावले जाते किंवा नाही, पण या सभेने मला माझी जागा दाखवून दिली आहे, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. निवडणुकीसाठी कोण-कोण प्रचार करणार याबाबत माहिती नसल्याचेही सांगितले. सिद्ध म्हणाले, 'याआधी 2004 मध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या रॅलीत आपल्याला बोलण्यापासून थांबवण्यात आले होते. त्यावेळी अमृतसरचा भाजपचा खासदार होतो.

पंजाबचे काँग्रेस अध्यक्ष सुनील जाखड म्हणाले, 'सिद्धू यांना रॅलीत सहभागी करुन घ्यायला हवे होते. ते एक उत्तम वक्ता असून, पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. राहुल गांधींनी मला सगळ्यांचे भाषण झाले आहे का असे विचारले होतं, पण मी त्यांच्यासोबतच आलो असल्याने याची कल्पना नव्हती.' सुखजिंदर सिंह रंधावा म्हणाले, 'आपल्याला मुख्यमंत्री अमरिंदर आणि काँग्रेस महासचिव आशा कुमार यांनी चार जणांची नावे देण्यास सांगितलं. राहुल गांधी यांनी कांगडा येथे दुसऱ्या रॅलीसाठी जायचे असल्याने फक्त चारच लोक भाषण करतील असे सांगण्यात आले होते. जर मला माहिती असते की, सिद्धू यांनाही बोलवायचे आहे तर नक्की बोलावले असते.'

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचे वक्तव्य केल्याने पक्षासमोर अडचण निर्माण झाली होती. हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार नसल्याचेही ते म्हणाले होते.

Web Title: navjot singh siddhu Said they show my place for not inviting in rahul gandhis rally

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com