निवडणूक संन्यासाच्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांचं काही तासांतच घूमजाव; वक्तव्याचा वेगळा अर्थ काढल्याचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

 चंद्रकांत पाटील हे राज्याच्या मंत्रिमंडळातले दुसऱ्या क्रमांकाचे नेते. भावी मुख्यमंत्री म्हणूनही चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडं पाहिलं जातं. पण त्यांनी कोल्हापुरात अचानक निवडणूक न लढवण्याचा निर्धार बोलून दाखवला.

चंद्रकांतदादांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. दादांनी अवघ्या काही तासांत घूमजाव केलं.

आगामी निवडणुकात पश्चिम महाराष्ट्राच्या गडाला खिंडार पाडण्याची भाजपची रणनिती आहे. त्यामुळं चंद्रकांतदादांना कुठल्याही निवडणुकीत अडकवण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळंच दादांना एका जागेसाठी अडकवून ठेवण्यापेक्षा पंधरा ते वीस जागांवर भाजपचा डोळा आहे. चंद्रकांत पाटील निवडणूक लढो किंवा न लढो पण ते मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये नाहीत हे त्यांनी कधीच म्हटलेलं नाही हे ही लक्षात ठेवायला हवं.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live