Ganesh Festival : गणेशोत्सवासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल

Ganesh Festival : गणेशोत्सवासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल

मुंबई - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. हा बदल दीड दिवसाचे विसर्जन (ता. 14), गौरी-गणपती व पाचव्या दिवसाचे विसर्जन (ता. 17), सातव्या दिवसाचे विसर्जन (ता. 19) व अनंत चतुर्दशी (ता. 23)ला दुपारी 12 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत लागू राहील. 

या बदलात 53 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. 56 रस्ते एक मार्गी, 18 रस्ते जड वाहनांसाठी बंद ठेवले जातील. 99 मार्गांवर पार्किंगला बंदी असेल. 

गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, बडी मस्जिद-बांद्रा, जुहू चौपाटी आणि गणेश घाट-पवई या पाच महत्त्वाच्या विसर्जनस्थळी मुंबई शहर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीचे नियमन करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी मनोरे उभे करण्यात आले आहेत. 

मिरवणुका व त्या पाहण्यासाठी आलेले लोक यांचे मार्ग सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वेगळे ठेवण्यासाठी महत्त्वाच्या मार्गावर बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान वाहने बंद पडून अथवा इतर अडथळा आल्यास तो दूर करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस, महापालिकेकडून लहान व मोठ्या क्रेन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांसाठी प्राथमिक उपचार केंद्रे सुरू केली आहेत. 

वाहतुकीची व्यवस्था 
-नियमनासाठी 3,161 पोलिस, 1,570 ट्रॅफिक वॉर्डन्स. 
-मदतीला अनिरुद्ध ऍकॅडमी, आर. एस. पी. शिक्षक, नागरी संरक्षण दल, वॉटर सेफ्टी पेट्रोल, एन.एस.एस., स्काऊट गाईडचे विद्यार्थी. 

Web Title: Traffic change for Ganeshotsav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com