नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघातून उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला असून, भारतीय जनता पक्षाचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा विजय झाला आहे.

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघातून उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला असून, भारतीय जनता पक्षाचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा विजय झाला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले चव्हाण यांच्या निवडीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. चव्हाण यांचा पराभव झाल्यामुळे पक्षाला मोठा फटका बसला आहे. नांदेड लोकसभेचा निकाल काय लागणार? याकडे फक्त राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले असाताना मतमोजणीला सुरवात झाली. निकालाची उत्कंठा शिगेला पोहचली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर तसेच बहुजन वंचित आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे असा तिरंगी सामना नांदेड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला.

भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांना तीन लाख 74 हजार 355 मतं मिळाली. अशोक चव्हाण यांना तीन लाख 37 हजार 285 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांना एक लाख 26 हजार 086 मतं मिळाली.

मतदानाची आकडेवारी

  • प्रताप पाटील चिखलीकर(भाजप)- तीन लाख 74 हजार 355
  • अशोक चव्हाण (काँग्रेस)- तीन लाख 37 हजार 285
  • यशपाल भिंगे (वंचित बहुजन आघाडी)- एक लाख 26 हजार 086

Web Title: Close fight between Ashok Chavhan and Prataprao Chikhlikar in Nanded constituency for Lok Sabha 2019


संबंधित बातम्या

Saam TV Live