सुजय विखे पाटील ठरतायत संग्राम जगतापांवर भारी

सुजय विखे पाटील ठरतायत संग्राम जगतापांवर भारी

अकोले : नगर मतदार संघात मतमोजणीला सुरवात झाली असून दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील 16700 मतांनी आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदार संघात कोण विजयी होणार यापेक्षा दक्षिणेत सुजय कि संग्राम कोण बाजी मारणार याचीच चर्चा व उत्सुकता लोकांमध्ये जास्त प्रमाणात आहे .

लोकसभा निवडणुकीचा निकाल एक दिवसावर येऊन ठेपला असताना लोकामध्ये उत्सुकता वाढलेली आहे. अकोले - संगमनेर तालुका शिर्डी लोकसभा मतदार संघात आहे .हा मतदारसंघ राखीव असल्याने या मतदारसंघात निवडणुकीत उत्साह पाहायला मिळाला नाही माञ नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दोन दिग्गज घराण्यातील उमेदवारामध्ये झालेली लढत त्यात थोरात - विखेची पणाला लागलेली प्रतिष्ठा यामुळे निवडणूक अटीतटीची झाली. निवडणुकीचा निकाल जवळ आलेला असताना गावा गावात पारावर ,कट्ट्यावर ,चाैकात निवडणूक निकालाविषयी तसेच देशाचे,राज्याचे समीकरण काय असेल? यावर चर्चा सुरु आहे. त्यात भर ती टी व्ही वरील एक्झिट पोल च्या अंदाजाची.

अकोले तालुक्यात चर्चा होताना प्रामुख्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निकाला विषयी चर्चा होण्यापेक्षा नगर दक्षिण मधून सुजय विखे विजयी होणार कि संग्राम जगताप विजयी होणार यावरच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.अनेक राजकीय कार्यकर्त्यामध्ये तर सुजय कि संग्राम यावर पैजाही लागलेल्या आहेत .एकूणच उत्तरेच्या लोकांना दक्षिणेचीच उत्सुकता जास्त आहे. 

Web Title: Close fight between Sujay Vikhe Patil and Sangram Jagtap in Nagar for Lok Sabha 2019

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com