कर्नाटकमधील विजयानंतर काँग्रेस उरली फक्त तीन राज्यांपुरती

कर्नाटकमधील विजयानंतर काँग्रेस उरली फक्त तीन राज्यांपुरती

नवी दिल्ली - 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातून पायउतार व्हावे लागलेल्या काँग्रेसला गेल्या चार वर्षांत एक-एक राज्य आपल्या हातून गमवावे लागले. याला अपवाद फक्त तीन राज्ये असून, या तीन राज्यांतच काँग्रेसचे सरकार राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्नाटकमधील विजयानंतर जवळपास पूर्ण देशच भाजपच्या रंगात भगवामय झाल्याचे पहायला मिळत आहे.

देशात 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी कर्नाटकमधील निवडणुकीला महत्त्व आले होते. पंतप्रधान मोदींनी या निवडणुकीत जोरदार प्रचार करत कर्नाटक काँग्रेसमुक्त करण्याचा नारा दिला होता. यात अखेर यश आले असून, भाजपने कर्नाटकमधून काँग्रेसला सत्तेतून पायउतार केले आहे. या विजयामुळे दक्षिणेकडील राज्यात भाजपने शिरकाव केल्याचे पहायला मिळत आहे. आता देशातील 22 राज्यांवर भाजपप्रणित पक्षांची सत्ता आहे. भाजप याठिकाणी सत्तेत सहभागी आहे.

पंतप्रधान मोदींनी कर्नाटकमध्ये 21 सभा घेतल्या होत्या. तसेच नमो अॅपच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला होता. मोदींनी काँग्रेसवर टीका करताना या निवडणुकीनंतर काँग्रेस पंजाब, पद्दुचेरी आणि परिवारापुरती (पीपीपी) राहील अशी टीका केली होती. सध्या अशीच परिस्थिती देशात आहे. पंजाब, पुद्दुचेरी आणि मिझोराम या तीन राज्यांतच काँग्रेसचे सरकार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com