संजय निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करा; काँग्रेस नेत्यांची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हटाव मोहिम पुन्हा एकदा सुरु करण्यात आलीय. मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन संजय निरुपम यांना हटवण्याची मागणी केलीय.

यामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान, सुरेश शेट्टी, एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदूरकर, भाई जगताप आणि गुरुदास कामत गटाच्या अनेक नेत्यांचा समावेश होता.

संजय निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना अध्यक्ष करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.त्यामुळं आता मुंबई काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live