राज्यात काँग्रेसचा सुपडासाफ? चंद्रपुरात बाळू धानोरकरांनी राखली लाज 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

लोकसभा निव़डणुकीत काँग्रेसची दाणादण झालीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना आपल्याच होम पीच नांदेडमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. तिकडे सोलापुरात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेही पराभूत झालेत. मुंबईतही काँग्रेसला मतदारांनी नाकारलंय. दक्षिण मुंबईतून काँग्रेसच्या विद्यमान मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरांचा तर उत्तर-पश्चिम मतदार संघातून मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना पराभव झालाय. कधी काळी सत्तेत राहिलेल्या काँग्रेसचा फक्त एक खासदार निवडून आलाय. तो म्हणजे चंद्रपुरात बाळू धनोकरांच्या रुपानं.

गेल्या काही वर्षांपासून राज्यात काँग्रेसची जोरदार पिछेहाट सुरु आहे. 2014 मध्ये काँग्रेसचे दोन खासदार होते. नांदेडमधून अशोक चव्हाण तर हिंगोलीतून राजीव सातव काँग्रेसचं प्रतिनिधित्व करत होते.  2019 मध्ये काँग्रेस खासदारांची संख्या एक वर आलीय. सक्षम नेतृत्वाचा अभाव, नेत्यांमधील गटातटाचं राजकारण,तसंच समन्वयाचा अभाव ही महत्त्वाची कारणं सांगितली जातायंत.  

राज्यात विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना मोदींच्या त्सुनामीत काँग्रेसचा तारु भरटकलाय. अशावेळी काँग्रेसला योग्य दिशा दाखवण्यासाठी चांगल्या कॅप्टनची गरज आहे. तो कोण याचीच चर्चा आता राजकारणात सुरु झालीय

संबंधित बातम्या

Saam TV Live