प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर आता रासायनिक खतांवर होणार बंदी

प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर आता रासायनिक खतांवर होणार बंदी

दाभोळ - महाराष्ट्रात यापुढे रासायनिक खतांवर बंदी घालण्यात येणार असून प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर घेतलेला हा फार मोठा क्रांतिकारी निर्णय असेल असे सूतोवाच राज्याचे पर्यावरण मंत्री  रामदास कदम यांनी केळशी येथे व्यक्त केले.

राज्याच्या पर्यावरण विभागामार्फत राज्यसराेवर संवर्धन योजनेंतर्गत उंबरशेत येथील गौरीच्या तळ्याचे नुतनीकरण व सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. तलावाच्या संवर्धनासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रासायनिक खते ही विषासमान आहेत. खतांच्या मात्रेने कर्करोगासारख्या दुर्धर व्याधी जडतात. माणसाचे आयुष्यही 15 ते 20 वर्षांनी कमी होते असे तज्ञांचे मत आहे. याचा विचार करून रासायनिक खते बंद करण्याबाबत विचार सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले.

राज्यात 227 नगरपालिका आणि 27 महानगरपालिका आहेत. त्यांच्या हद्दीत जमा होणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. गायी, म्हशी, गोठ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून शेतकर्‍यांकडून शेण विकत घेऊन सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. हे खत शेतकर्‍यांना  50 टक्के सवलतीत देण्यात येणार आहे. 

कोकणावर सातत्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने अन्याय केला. राज्यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रात 19 टक्के सिंचन क्षमता असून कोकणामध्ये केवळ ती एक टक्के आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी विदर्भातील सिंचनासाठी एक हजार कोटींचा निधीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणला. त्यावेळी कोकणावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 450 कोटी रुपयांचा निधी मिळविला. या वेळी युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य योगेश कदम, विधानसभा संपर्क प्रमुख दादा गोवले, उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे आदी उपस्थित होते.

Web Title: After the ban on plastic, now the ban on chemical fertilizers is prohibited

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com