राहुल गांधींचा पराभव डहाणुच्या सुनबाई स्मृती इराणी मुळेच

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 मे 2019

बोर्डी (डहाणू) : काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव डहाणुच्या सुनबाई स्मृती इराणी यांनी केल्याने डहाणुमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

स्मृती इराणी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांच्या विरोधात 2014च्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करुन तितक्याच जोमात केंद्रीय मंत्रीमंडळात पाच वर्षे काम करीत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर सर्व डहाणुवासियांचे अमेठी मतदार संघाच्या प्रचारावर लक्ष लागुन राहिले होते.

स्मृती इराणी चित्रपटसृष्टीत काम करीत असताना डहाणुतील चिकू बागायतदार झुबिन इराणी यांच्या संपर्कात आल्या. त्यानंतर त्यांचा विवाह झाला व त्या डहाणुच्या स्नुषा झाल्या.

दरम्याच्या काळात स्मृती यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी स्मृती इराणी यांच्या लोकप्रियतेकडे बघत त्यांना केंद्रीय राजकारणात प्रवेश दिला.

2014च्या लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही इराणी यांना मंत्रीमंडळात समावेश करुन अमेठी लोकसभा मतदार संघ काबीज करण्याचा एक कलमी कार्यक्रम इराणी यांच्याकडे सोपविण्यात आला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी पाच वर्षे केलेल्या परिश्रमामुळेच विजय मिळवला अशी डहाणुत चर्चा आहे.

Web Title: Rahul Gandhi s defeat because of Smriti Irani daughter in law of Dahabu

संबंधित बातम्या

Saam TV Live