अण्वस्त्रांच्या वापराबाबत भारताकडून पहिल्यांदाच वक्तव्य, पाहा काय म्हणालेत राजनाथ सिंह  

अण्वस्त्रांच्या वापराबाबत भारताकडून पहिल्यांदाच वक्तव्य, पाहा काय म्हणालेत राजनाथ सिंह  

नवी दिल्ली : आजपर्यंत भारताने कधीही अणवस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही. पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज (शुक्रवार) केले. 

पोखरण येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात राजनाथसिंह उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. राजनाथसिंह म्हणाले, की 1998 मध्ये पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. वाजपेयी हे भारतीय राजकारणात युगपुरुष आहेत. त्यांच्या आदर्श तत्त्वांमुळे सुलभता आणि सुशासनला राजकारणात चालना मिळाली. 

'सबका साथ, सबका विश्वास'ची प्रेरणा अटलजींकडून

'सबका साथ, सबका विश्वास'चे नुसार मोदी सरकार सध्या काम करत आहे. मात्र, याची प्रेरणा आम्हाला अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडूनच मिळाली आहे, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले. 

WebTitle : marathi news defence minister rajnath singh on use of nuclear bomb and India's policy 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com