संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी हुतात्मा झालेल्या जवानाच्या वीरमातेचे पाय धरून घेतले  दर्शन 

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी हुतात्मा झालेल्या जवानाच्या वीरमातेचे पाय धरून घेतले  दर्शन 

डेहराडून: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील जवानांच्या स्मृतीप्रत्यर्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा झालेल्या जवानाची वीरमाता व्यासपीठावर आल्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे पाय धरून दर्शन घेतले. व्यासपीठ व उपस्थितांनी टाळ्या वाजवून सीतारामन यांच्या या कृतीचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले.

हुतात्मा जवानांच्या स्मृतीप्रत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला संरक्षमंत्री निर्मला सीतारामन या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. हुतात्मा जवान अजित प्रधान यांच्या वीरमाता हेमा कुमारी यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. हेमा कुमारी या व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी निर्मला सितारण यांना पुष्पगुच्छ दिला. निर्मला सीतारामन यांनी पुष्पगुच्छ बाजूल ठेवत वीरमातेचे पाय धरत दर्शन घेतले. सीतारामन यांच्या या कृत्यामुळे व्यासपीठावरील सर्वचजण अवाक झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामळे हेमा कुमारी यांनीही काही क्षण काहीच समजेनासे झाले. व्यासपीठावरील व उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून निर्मला सीतारामन यांच्या कृत्याचे स्वागत केले.

मसूरीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश जोशी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन निर्मला सीतारामन यांच्या या कृत्याचे कौतुक केले आहे. शिवाय, सीतारामन यांच्या या कृत्याने आम्हा सर्वच माजी सैनिकांची मान अभिमानाने ताठ झाल्याचे गणेश जोशी यांनी ट्विटरवर लिहिले आहे. दरम्यान, बिहारमध्ये हुतात्मा जवान पिंटू कुमार सिंह यांचे पार्थिव आणण्यासाठी एकही राजकीय नेता विमानतळावर उपस्थित राहिला नाही. यामुळे जोरदार टीका झाली होती.

Web Title:Defense Minister Nirmala Sitaraman took the feet of martyr jawans mother in deharadun

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com