(VIDEO) पोलिस बळाचा किसान सभेकडुन निषेध

(VIDEO) पोलिस बळाचा किसान सभेकडुन निषेध

मुंबई : दिल्ली येथे शेतकाऱ्यांवर पोलिस बळाचा किसान सभेने निषेध केला आहे. गांधी जयंतीच्या दिवशी देशाच्या राजधानीत अन्नदात्या शेतकऱ्यांवर पोलिस बळाचा वापर करून सरकारने हिंसेचा सहारा घेतला आहे. सरकारने असे करून सत्तेवर राहण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे. किसान सभा सरकारच्या या कृतीचा निषेध करत असल्याचे किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. देशभर शांततेच्या मार्गाने वारंवार आंदोलने करून आपल्या व्यथा, मागण्या, अपेक्षा सरकार समोर मांडत आहे. सरकार मात्र प्रत्येक आंदोलनाच्या वेळी मागण्या मान्य करते, मान्य मागण्यांची अंमलबजावणी मात्र करण्यात येत नाही. शेतकऱ्यांचा वारंवार विश्वासघात करण्यात येतो. शेतकऱ्यांच्या मनात यामुळे मोठा असंतोष खदखदतो आहे. आजच्या दिल्लीच्या आंदोलनाच्या निमित्ताने हा असंतोष व्यक्त झाला आहे.

वारंवार होणारा विश्वासघात, धोरणे ठरविताना केला जाणारा दुजाभाव व उपेक्षा शेतकरी या पुढे सहन करणार नाहीत हा इशाराच या आंदोलनाने सरकारला दिला आहे.

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील 180 संघटना नोव्हेंबर महिन्यात लाखोंच्या संख्येने लाँग मार्च काढणार आहेत. दिल्लीच्या चारही बाजूने चार लाँग मार्च संसदेच्या दिशेने नेण्यात येणार आहेत. आजचे दिल्लीतील आंदोलन त्या विशाल लढ्याची झलक आहे. सरकारने आता तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी व विश्वासघात करणे थांबवावे. अन्यथा विश्वासघाताची मोठी किंमत सरकारला मोजावी लागेल.

WebTitle : marathi news delhi kisan kranti padyatra farmers agitation 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com