दहशतवादाची थरारक कथा 'काफिर' ही वेबसिरिज येते आहे तुमच्या भेटीसाठी. ट्रेलर प्रदर्शित (व्हिडीओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 मे 2019

अभिनेत्री दिया मिर्झा अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र ती डिजिटल मिडीयामध्ये पदार्पण करतेय. 'काफिर' या वेबसिरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वेबसीरिजची तरुणाईमधील क्रेझ बघता चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्मातेही वेबसिरिजतून विविध विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. सिनेविश्वातील अनेक कलाकारही सध्या वेबसीरिजच्या माध्यमातून डिजिटल मिडीयावर अनेक प्रयोगांचा भाग होत आहेत. ‘काफिर’ ही वेबसिरिज यापैकीच एक. 

या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. 'काफिर'मधून अभिनेत्री दिया मिर्झा वेबसीरिज विश्वात पदार्पण करत आहे. या सीरिजमध्ये मोहित रैना सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील तणाव या वेब सिरिजमध्ये दाखविण्यात आला आहे. एका दहशतवादी आरोपीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकार-वकिलाचा प्रवास या सीरिजमध्ये दिसतो. दियावर दहशतवादाचे आरोप करण्यात आले आहेत व ती अनेक वर्ष आपल्या मुलीसोबत तुरुंगात आहे. मोहित रैनाने एक पत्रकाराची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याने वकीलीचेही शिक्षण घेतले आहे. दिया मिर्झाला न्याय मिळवून देण्यासाठी तो पुन्हा वकीली पेशा स्वीकारतो असे ट्रेलरमध्ये दिसते.

सोनम नायर दिग्दर्शित या वेब सिरिजचे लेखन भवानी अय्यर यांनी केले आहे. ही कथा सत्य घटनांवर आधारित आहे. ही सीरिज झी5 वर 15 जूनला प्रदर्शित होईल.

Web Title: Dia Mirza starer Kaafir web series official trailer launched

संबंधित बातम्या

Saam TV Live