सरकार स्थापनेच्या पुर्वतयारीसाठी भाजपची डिनर डिप्लोमसी

सरकार स्थापनेच्या पुर्वतयारीसाठी भाजपची डिनर डिप्लोमसी

ब्युरो रिपोर्ट, मुंबई :: लोकसभेच्या सातव्या म्हणजेच अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर झालेल्या एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसार पुन्हा एकदा एनडीएचे सरकार सत्तारूढ होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता भाजपचे चाणक्य असा लौकीक असलेल्या अमित शहांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. मित्र पक्षांसाठी डिनर हा याच रणनितीचा भाग असून या भोजन सोहळ्याला पंतप्रधान मोदींची उपस्थितीही असणार आहे.

लोकसभेत सत्ता स्थापनेसाठी 272 ची मँजिक फिगर आवश्यक असून विविध एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसार एनडीएला 280, युपीएला 130 तर इतर पक्षांना 135 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज आहे. हे निष्कर्ष जसेच्या तसे अंतिम निकालात रुपांतरीत झाल्यास सरकारच्या स्थैर्यासाठी भाजपला मित्र पक्षांची गरज लागेल. 

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जवळपास चाळीस छोट्या मोठ्या पक्षांचा समावेश आहे.यामध्ये शिवसेना, शिरोमणी अकाली दल, नीतीश कुमार यांचा जेडीयू तसेच नव्याने दाखल झालेला अण्णा द्रमुक, पासवान यांचा लोजपा, अनुप्रिया पटेल यांचा अपना दल, आणि प्रफुल्ल कुमार महंतो यांचा असम गण परिषद यासारख्या मोठ्या पक्षांचा समावेश आहे. 

साहजिकच भाजपला पुरेशा जागा न मिळाल्यास एनडीएच्या निर्णय प्रक्रियेत भाजपच्या बरोबरीनेच या मोठ्या पक्षांचाही प्रभाव असेल. अशा वेळी शिवसेनेसारखा एखादा पक्ष डोईजड होणार नाही याची दक्षता घेण्यासाठीच भाजपने हा डिनर डिप्लोमसीचा मार्ग अवलंबल्याची चर्चा आहे. 
WebTitle : marathi dinner diplomacy of BJP before forming a new government 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com