यशोदाआजीच्या रेशनकार्डवर मोती कुत्र्याचं नाव, निराधार पेन्शनच्या वाटेत आडवा आला कुत्रा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पुणे जिल्ह्यातल्या तरडे गावच्या यशोदाबाई विचारे आजी निराधार आहेत. त्यांना शासकीय निराधार योजनेचा लाभ हवा आहे. ही पेन्शन मिळवण्यात अडचण ठरलंय हे रेशनिंग कार्ड. 

रेशनिंग कार्डावर या आज्जीच्या मुलाच्या जागी चक्क कुत्र्याचं नाव नोंदवण्यात आलंय. हा खोडसाळपणा कुणी केला हे ही यशोदाआज्जीना सांगता येत नाहीय.
त्यांच्या रेशनिंग कार्डावर मोतीरामचं नाव असल्यानं सरकारी अधिकारी त्यांना निराधार योजनेचा लाभ देण्यास तयार नाहीत.

सरकारी अधिकारी नियमावर बोट ठेऊन बसलेत. सध्या मोती कुत्राही त्यांच्यासोबत नाही. मोती मेला की जिवंत आहे याचा पुरावाही त्यांच्याकडं नाही. कुत्रा मेला असेल तर त्याचा मृत्यूदाखला कुठून आणायचा असा सवाल यशोदाआज्जींना पडलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live