मृत्यूची 'लाल लिची' ? लिची खाल्ल्यामुळं बिहारमध्ये मृत्यूचं तांडव?

मृत्यूची 'लाल लिची' ? लिची खाल्ल्यामुळं बिहारमध्ये मृत्यूचं तांडव?

लाल लिची पाहिली तरी तोंडाला पाणी सुटतं. पण, याच लाल लिचीनं बिहारमधल्या 100 निष्पाप मुलांचा जीव घेतलाय. पोटच्या गोळ्याची झालेली अवस्था पाहून, आई-वडिलांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहतोय. आपलं बाळ जगावं, ते लवकर बरं व्हावं, यासाठी खूप प्रयत्न केले जातायत. डॉक्टरही मुलांवर उपचार करतायत. पण, आतापर्यंत उपचारादरम्यान 100 पेक्षा जास्त मुलांचा बळी गेलाय. लाल लिची खाल्ल्यानं मेंदूज्वर होऊन मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

'चमकी' या मेंदूच्या तापाच्या आजारानं मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण, 100 पेक्षा मुलं उपचारादरम्यानच दगावली. ताप कशामुळं आला? नक्की काय होतंय? ते कळण्याआधीच मुलांनी प्राण सोडला. कित्येक मुलांवर उपचार सुरू आहेत, पण आलेला पेशंट पुन्हा घरी जाईल याची काहीच गॅरंटी नाही.

मृत्यूचं कारण लिची की इतर आजार यावर तपास सुरू आहे. कारण, बिहारमध्ये याच सीझनमध्ये लिचीची लागवड होते आणि जास्त प्रमाणात लिची खाल्ली तर त्याचे परिणामही गंभीर होतात. लहान मुलांना लगेच मेंदूज्वरही होतो. वेळेत उपचार न मिळाल्यानं पेशंट कोमातही जातो. पण, लिची आरोग्यासाठी घातक आहे का हे आम्ही फळ एक्सपर्टकडून जाणून घेतलं.

लिची खाण्याआधी काय काळजी घ्यावी?
- उपाशीपोटी लिची खाऊ नये
- लिचीच्या कच्च्या फळामध्ये रसायने जास्त असून उलट्या होण्याची शक्यता असते
- एकाच वेळी जास्त प्रमाणात लिची खाऊ नये
- लिची खाताना बी खाऊ नये 

लिची योग्य प्रकारे खाल्ल्यास धोकादायक नाही. मात्र, ते खाताना काळजी घ्यायला हवी. लिचीमुळं मुलांचा जीव गेल्याचं बोललं जात असलं तरीदेखील हे कशामुळं होतंय हा संशोधनाचा भाग आहे. त्यामुळं 100 पेक्षा जास्त निष्पापांचा बळी लिचीनं घेतला की कोणत्या आजारानं हे तपासाअंतीच स्पष्ट होईल. पण, तुम्ही लाल लिची खात असाल तर सांभाळून. 

Web Title : marathi news eating lichi may be very harmful to body due to toxic content 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com