लोकसभा निकालांवर नाही दिसला राज फॅक्टर; मनसेच्या बालेकिल्ल्यात युतीचीच सरशी

लोकसभा निकालांवर नाही दिसला राज फॅक्टर; मनसेच्या बालेकिल्ल्यात युतीचीच सरशी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकांपूर्वी झंझावाती ९ सभा घेत वातावरण ढवळून काढलं होतं. महायुतीसाठी एकतर्फी वाटणाऱ्या महाराष्ट्र लोकसभेच्या सामन्यात राज ठाकरेंच्या भाषणांमुळं एक वेगळीच रंगत आली होती. पण जे एक्झिट पोल आलेयत ते पाहता राज फॅक्टर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सपशेल फेल झाल्याचंच चित्र आहे. 

मुंबई-ठाणे पट्टा, नाशिक, पुणे या मनसेचा प्रभाव असणाऱ्या क्षेत्रातही राज यांची जादू चालली नसल्याचंच चित्र आहे. मुंबई-ठाणे या युतीच्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या पट्ट्यात शिवसेना-भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळण्याचं चित्र आहे. पुणे आणि नाशिक जिथे मनसेचं संघटनात्मक कार्य प्रभावी आहे तिथेही राज फॅक्टरमुळे युतीला फटका बसल्याचं चित्र नाही.

राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडिओचा धसका शिवसेना-भाजपनं घेतल्याचं चित्र लोकसभा निवडणुकांपूर्वी निर्माण झालं होतं. राज ठाकरेंच्या झंझावती भाषणांमुळं आघाडीला निश्चितपणे फायदा होईल असा कयास बांधला जात होता. पण प्रत्यक्षात एक्झिट पोलमध्ये जे आकडे दिसतायंत त्यानुसार लोकसभा निवडणुकांच्या निकालांवर राज यांचा प्रभाव पडला नसल्याचं जाणवतंय. त्यामुळं राज यांचं वक्तृत्व बिनतोड आहे, राज ठाकरेंचं भाषण ऐकायला लोक आवर्जून गर्दी करतात पण या सगळ्याचं मतांमध्ये मात्र परिवर्तन होत नाही अशा खमंग चर्चा पुन्हा एकदा राजकीय पटलावर रंगू लागल्यात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com