देशभरात ईद-उल्-फित्रचा उत्साह !
जामा मशिदीमध्येही रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळतोय. मजानचा महिनाभराचा उपवास केल्यानंतर अखेरीस आज ईद साजरी केली जातेय. दिल्लीतील जामा मशिदीच्या शाही इमामांनी शुक्रवारी रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर ईदची घोषणा केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही 'ईद-उल-फितर'च्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत देशातील बंधुभाव आणि प्रेम वाढण्यासाठी प्रार्थना केली.

Id Mubarak and good wishes to all fellow citizens, especially to our Muslim brothers and sisters in India and abroad. May this happy occasion bring joy to your families and foster fraternity, understanding and mutual goodwill in our shared society #PresidentKovind
— President of India (@rashtrapatibhvn) June 16, 2018
रमजान ईदनिमित्त मुंबईतही मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. इस्लाम धर्मात रमज़ान महिना अतिशय पवित्र समजला जातो. या काळात संपूर्ण महिनाभर रोजे करून आत्मशुद्धी केली जाते आणि परमेश्वराची उपासना केली जाते. मुस्लिमांबरोबरच हिंदू भाविकही महिनाभर तेवढय़ाच सश्रद्ध भावनेतून रोजे करतात.