तेव्हा युती नसल्यामुळेच आज भाजपचा मुख्यमंत्री : खडसे

तेव्हा युती नसल्यामुळेच आज भाजपचा मुख्यमंत्री : खडसे

जळगाव : मागच्या कालखंडात युती नसताना भाजपच्या 122 जागा आल्या होत्या. जर युती तोडली नसती तर आमचा मुख्यमंत्री होऊ शकला नसता, हेदेखील वास्तव आहे. तेव्हा युती न केल्यामुळेच आज राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

खडसे म्हणाले, की भाजप- शिवसेनेत आज युती करण्याबाबत एकच मतप्रवाह असल्याने "युती'चा निर्णय झाला असून तो चांगला आहे. आपण त्याचे स्वागत करतो. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला अनुकूल वातावरण होते. त्यामुळे युती न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. पक्षाचा वरिष्ठ नेता म्हणून ती घोषणा करण्याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली होती, तो निर्णय माझा एकट्याचा नव्हे तर सर्वांचा होता. आज युती असायला हवी असा विचारप्रवाह असल्याने पक्षाचे अध्यक्ष व राज्यातील नेतृत्व म्हणून मुख्यमंत्र्यांनी युतीची घोषणा केली आहे, या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

भाजप अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. आगामी लोकसभा व विधानसभेत दोन्ही पक्ष युतीनेच लढणार असल्याचे जाहीर केले. या पत्रकार परिषदेला एकनाथ खडसे गैरहजर होते.


WebTitle :: marathi news eknath khadase on bjp and cm position of maharashtra 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com