एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; एसीबीकडून क्लीन चिट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 मे 2018

पुणे : पुण्यातील भोसरीतील वादातील जागेप्रकरणी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) क्लीन चिट देण्यात आली आहे. यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

EXCLUSIVE :: क्लीन चिट मिळाल्यानंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया ऐका 

पुण्यातील भोसरीतील वादातीत जागेसह एकनाथ खडसे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एसीबीकडून करण्यात येत होता. एसीबीने शुक्रवारी न्यायालयात या प्रकरणाचा अहवाल सादर केला असून, आज तो सार्वजनिक करण्यात आला. या अहवालात एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर केल्याचं स्पष्ट होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

क्लीन चिट मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले, की कार्यकर्त्यांना विश्वास होता नाथाभाऊ असे कधीच करणार नाहीत. पक्ष नेहमीच पाठिशी उभा राहीला आणि धीर देत राहीला. पक्षातील नेत्यांनी मला सहकार्य केले. यापुढेही माझी वाटचाल भाजपसोबतच असेल.

संबंधित बातम्या