माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं वृद्धापकाळानं निधन 

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं वृद्धापकाळानं निधन 

मुंबईसह देशभरातील कामगार चळवळीचे अध्वर्यू, 'बंदसम्राट' आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून शारीरिक व्याधींशी झुंजणाऱ्या फर्नांडिस यांच्यावर काही दिवसांपासून दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह सर्व दिग्गन नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. 

जनता दल युनायटेड (जदयू) पक्षाकडून ते बिहारमधील मुझफ्फरनगरमधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 1998 ते 2004 या काळात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते. त्यांनी याबरोबरच दुरसंचारमंत्री, उद्योगमंत्री आणि रेल्वेमंत्री या जबाबदाऱ्याही पार पाडल्या होत्या.

फर्नांडिस हे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य राहिले होते. मुंबईतील कामगार चळवळीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. फर्नांडिस हे 1967 ते 2004 असे 9 वेळा लोकसभेत निवडून आले होते. जनतेचा नेता अशी ओळख असलेल्या फर्नांडिस यांच्या निधनानंतर कामगार नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

WebTitle : marathi news ex defence minister George Ferdinand passed away due to old age 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com