पक्ष्यांसाठी राखले दीड एकरातील ज्वारीचे पीक; पक्षिमायेचे पक्षिप्रेमींतून कौतुक

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 जानेवारी 2019

वडणगे - घरात प्राणी, पक्ष्यांना खाद्य, पाणी देत त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो. वाढत्या शहरीकरणामुळे अजूनही पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे. शिवाजी पेठेतील सुरेश दिनकर सरनाईक - नागावकर या शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक चक्क पक्ष्यांना खाण्यासाठी राखून ठेवले आहे. गेली पाच वर्षे ज्वारीच्या उत्पन्नाचा त्याग करून त्यांनी दाखविलेल्या पक्षिमायेचे पक्षिप्रेमींतून कौतुक होत आहे.

सुरेश सरनाईक-नागावकर यांची पिरवाडी (ता. करवीर) येथील आपट्याचा माळ या भागात तीन एकर शेती आहे. यातील दीड एकर क्षेत्रात त्यांनी ज्वारीचे पीक घेतले आहे. या सर्व क्षेत्रांतील ज्वारीचे उभे पीक सरनाईक यांनी पक्ष्यांसाठी राखून ठेवले आहे. सध्या त्यांच्या ज्वारीच्या पिकात अनेक प्रकारचे पक्षी सकाळ-संध्याकाळ येत असतात. काही पक्ष्यांनी तर या ठिकाणी असलेल्या मोठ्या झाडांवर आपली घरटी केली आहेत.

शेजारीच त्यांची विहीर असल्याने चारा, पाणी मुबलक मिळत असल्याने पक्ष्यांचे थवेच्या थवे या ठिकाणी पाहायला मिळतात. सरनाईक यांना या क्षेत्रातून १५ ते १६ क्विंटल ज्वारीचे उत्पादन मिळाले असते. मात्र, उत्पन्नाचा विचार न करता सरनाईक यांनी गेल्या पाच वर्षांपासून ज्वारीचे उभे पीक पक्ष्यांसाठी उपलब्ध करून पक्ष्यांविषयी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. सरनाईक यांच्या या पक्षीप्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्राणी, पक्ष्यांवर दया करण्याचा, त्यांना दान करण्याचा आपल्याला छंद आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या राहण्याबरोबरच त्यांच्या खाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील ज्वारीचे पीक पक्ष्यांना दान करण्याचा निर्णय घेतला. गेल्या पाच वर्षांपासून ज्वारीच्या उत्पादनाचा त्याग करून ते पक्ष्यांसाठी राखून ठेवत आहे.   
- सुरेश सरनाईक-नागावकर, शेतकरी

Web Title: marathi news farm kept reserved for birds in wadanage

संबंधित बातम्या

Saam TV Live