शेतकऱ्यांच्या नावाखाली 59 हजार कोटींची खैरात; कृषीकर्जावर बड्या कंपन्यांचा डल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

2016मध्ये 615 खातेदारांना प्रत्येकी सरासरी 95 कोटींचे कर्ज.. बँकांकडून शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक.

एकीकडे लाखभर रुपयांचं कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांचे हेलपाटे घालावे लागतात. अशा परिस्थितीत दुसरीकडे मात्र सरकारी बँका बड्या कंपन्यांना कर्ज देण्यासाठी चांगल्याच उदार असल्याचं समोर आलंय.

शेतकऱ्यांच्या नावाखाली बड्या कंपन्यांना स्वस्त दरात कृषीकर्ज देण्याचा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक असल्याचा आरोप केला जातोय. 2016 या एका वर्षात देशातील फक्त 615 खातेदारांना तब्बल 58 हजार 561 कोटी रुपयांचं कृषीकर्जाचं उदारहस्ते वापट करण्यात आलंय. 

म्हणजे सरासरी एका खातेदाराच्या वाट्याला तब्बल 95 कोटींचं कर्ज आलंय. आता आपल्या देशातला कोणता शेतकरी 95 कोटींचं कर्ज घेतो हा मोठा सवाल आहे. त्याचबरोबर इतकं प्रचंड कर्ज अलगद पदरात पाडून घेणारे हे भाग्यवान शेतकरी कोण याचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आलीय.

बँकांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली बड्या कंपन्यांना मुक्तहस्ते कर्जाचं वाटप केल्याचं समोर आलंय. 

WebTitle : marathi news farmers loan disbursed to farming industries instead of farmers 


संबंधित बातम्या

Saam TV Live