बुलडाण्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीला पडल्या चार मजली इमारतीएवढ्या भेगा

बुलडाण्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीला पडल्या चार मजली इमारतीएवढ्या भेगा

बुलडाण्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींवर मोठाल्या भेगा पडलेल्या पाहायला मिळतायत. बुलडाण्याच्या मलकापूर तालुक्यातल्या रावळगाव शिवारात हे दृश्य पाहायला मिळतंय. जमिनीचे जणू दोन तुकडेच झालेत असंच या भेगा पाहून वाटतंय. या भेगा जमिनीत 40 फूट खोलवर गेल्यात. म्हणजे तब्बल चार मजली इमारतीएवढ्या. या भेगा पाहून जमिनीचे दोन तुकडे केल्यासारखं दृश्य आहे. चार मजली इमारतीच्या गच्चीवरून जमिनीकडे पाहावं, इतक्या खोलवर त्या गेल्या आहेत. वरून पाहिलं आतमधलं काहीही दिसत नाही.

पाहा व्हिडीओ :  


आपल्या जमिनीत पडलेल्या या महाकाय भेगा पाहून शेतकऱ्यांची पाचावर धारण बसलीय. तब्बल पाच-सहा शेतांमध्ये या भेगा पडल्यात. या भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर जमिनीतून प्रचंड गडगडाट ऐकायला आला. आधी ग्रामस्थांना वाटलं भूकंप झाला की काय? मात्र, हा भूकंप नव्हता. त्यानंतर आवाज आला त्या दिशेला जाऊन पाहिलं असता तर हा भयानक प्रकार दिसला. 

अनेक नैसर्गिक घटना अशा असतात की त्याची संगती लावताच येत नाही. आता या घटनेमागचं वैज्ञानिक कारण शोधल्यानंतरच सत्य समोर येईल.

Web title : marathi news farms in buldana found mysterious cracks of around 40 feet deep

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com