फ्रान्सकडून क्रोएशियाचा पराभव; 20 वर्षांनी फ्रान्सने कोरलं विश्वचषकावर नाव   

 फ्रान्सकडून क्रोएशियाचा पराभव; 20 वर्षांनी फ्रान्सने कोरलं विश्वचषकावर नाव   

मॉस्को : सहा गोल, एक स्वयंगोल, बचावाला पूर्ण चकवणारे दोन गोल, वारचा वापर, विश्वकरंडक फुटबॉल सामन्याचे नाट्य वाढवणारे हे सर्व काही कमालीच्या नाट्यमय आणि थरारक विश्वकरंडकाच्या अंतिम लढतीत घडले. एखाद्या टिपीकल हॉलीवूडपटाला साजेसा असलेला सर्व मसाला अंतिम सामन्यात पेश झाला. फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव करत रशियात फ्रेंच क्रांतीच घडविली.

गेल्या चार विश्वकरंडकातील अंतिम लढतीचा इतिहास पाहिला तर गोलांचा दुष्काळच होता. या चार स्पर्धातील अंतिम लढतीतील गोलपेक्षा जास्त गोल एकाच अंतिम सामन्यात झाले. त्यात अखेर क्रोएशिया देशाचा जन्म झाल्यानंतर काही वर्षात विश्वकरंडक जिंकलेल्या फ्रान्सने बाजी मारली. या स्पर्धेत दिसणारे अखेरच्या दहा मिनिटातील गोल निर्णायक ठरण्याचे नाट्य घडले नाही आणि फ्रान्सचा विजय झाला. 

क्रोएशियाचा वन वे आक्रमणाचा ट्रॅफिक फ्रान्सने रोखला तो वेगवान प्रतिआक्रमणावर गोल करीत. खर तर ताकदवान प्रतिआक्रमणे ही क्रोएशियाची खासियत, पण या स्पर्धेत चेंडूवरील जास्त हुकुमत तसेच जास्त शॉटस्‌ विजय देत नाहीत हेच फ्रान्सने घडवून आणले. 

अँतॉईन ग्रिजमन - रॅफल वॅरेने ही फ्रान्सची यशस्वी दुक्कल. ग्रिजमनचा पास वॅरेनेकडे जाऊ नये या प्रयत्नात मारिओ मॅंदझुकिच याने चेंडू हेडर केला तो आपल्या गोलजाळ्यात. क्रोएशियाने सेट पिसेसवरच बरोबरी साधली. इवान पेरीसीच याने. त्याच्या लेफ्ट फूट कीकने फ्रान्सला संधीही दिली नव्हती. फ्री किकवर माफक संधीही त्याने सत्कारणी लावली होती, पण काही मिनिटातच त्याने मुद्दामहून चेंडूला हात लावल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि ग्रीजमनने फ्रान्सला आघाडीवर नेले. उत्तरार्धात पोग्बा आणि एम्बापे यांनी सहा मिनिटांच्या अंतराने गोल केले, त्यावेळी लढत संपली असे वाटले, पण चारच मिनिटात क्रोएशियाच्या मॅंदुझुकिच याने फ्रान्सच्या बचावपपटूंना सहज चकवत क्रोएशिया सहज हार पत्करणार नसल्याचेच जणू दाखवले. 

पुतिन यांच्या उपस्थितीत घुसखोरी
विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेला अखेर कडेकोट सुरक्षा भेदल्याचे गालबोट लागले. अंतिम लढतीतील उत्तरार्धाच्या सुरुवातीस चौघांनी मैदानात घुसखोरी करुन सर्वाना धक्का दिला, काही सेकंदातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, पण अंतिम लढतीस गालबोट लागलेच. 

WebTitle : marathi news fifa France beat Croatia in football worldcup final 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com